First Release.
भारताच्या विशाल भूभागावर राहणारे, भाषा, वेष, रीतिरिवाज यात विविधता असणारे सर्व भारतीय या संस्कृतीच्या स्नेहसूत्रात बद्ध आहेत.तिच्यामुळे आपण मोठे आहोत. आपल्यामुळे तीही महान आहे.आपल्या वर्षातला प्रत्येक महिना आणि आल्या महिन्यातला प्रत्येक दिवस तिनं कधी सणवार म्हणून, कधी लोकोत्सव म्हणून, कधी व्रत म्हणून तर कधी जयंती किंवा पुण्यतिथी म्हणून आपल्यासाठी संस्मरणीय केला आहे.या अखंड मंडलाकार गतीशी नातं सांगत ती आपल्याला घेऊन फिरत आहे.म्हणून दरवर्षी आपल्याला नवा उत्साह नवी प्रेरणा मिळत असते.या सर्व वर्षंवैशिष्ठांना एकत्रित करून त्या प्रेरणांचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयाचा आवाका अमर्याद असूनही त्यातला गावसलेलं आणि भावलेलं जे जे उत्तम, उदात्त आणि उज्वल आहे ते ते इथं एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.