मराठी भाषिक कौशल्य | Marathi bhashik koushaly

deep dawar diksha mitra

मराठी भाषिक कौशल्य | Marathi bhashik koushaly

Education
  • 0.00
(0 投票)

免费安装

5000

应用安装

Android 4.4+

最低版本

带广告

广告

01.12.2019

发布日期

最近更改:

मजकुर वाचन्याचे बटन समविष्ठ.

描述:

मराठी भाषिक कौशल्य

1. खेळ - खेळाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे.
2. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी ऑडिओ कथांचा समावेश. या कथा एकदा डाऊनलोड केल्यावर ऑफलाइन पद्धतीने देखील ऐकता येतात. दिलेल्या ऑडिओ फोल्डर मध्ये त्या कथा आपणास पहावयास मिळतील.
3.अक्षर ओळख - चित्र अक्षर आणि आवाजाचा वापर करून मराठी मधील प्रत्येक वर्णाक्षरेची ओळख करून दिली आहे. ही अक्षर ओळख करत असताना श्रवण भाषण वाचन या तिन्ही कौशल्यांच्या विकासासाठी अक्षर ओळख ही tab महत्त्वाचे आहे.
4.भाषण - अक्षर, बाराखडी, शब्द, वाक्य, कथा व उतारा यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ वापरले आहेत. विद्यार्थी अथवा शिक्षक विद्यार्थ्यांच्या गतीनुसार व्हिडिओची गती कमी-जास्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्पीड कंट्रोल चा वापर करून व्हिडिओ ची गती कमी अधिक करता येते.
5.डिजिटल रचनावाद - फरशीवर अथवा भिंतींवर केल्या जाणाऱ्या रंग कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची रचना करण्याची संधी रचनावादात विद्यार्थ्यांना देण्यात आली हीच संधी डिजिटल साधनाच्या माध्यमातून म्हणजेच ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पर्यंत पोहोचण्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे. यामध्ये चित्रवाचन, शब्द बनविणे, वाक्य तयार करणे आणि प्रश्न तयार करणे इत्यादीचा समावेश होतो.
6.वाचन सराव - वाचण्यासाठी बाराखडी, शब्द, वाक्य आणि उतारा यांचे नमुने तेही रचना अगदी शास्त्रीय पद्धतीने केली आहे. यामध्ये आपल्याला दिसणाऱ्या यादीवर दोन प्रकारच्या क्रिया करता येतात. 6.1 यादी वर क्लिक करून कार्ड स्वरूपात दिलेले यादीचे वाचन करता येते. तसेच पुढे- मागे जाता येते. याच ठिकाणी आपल्याला हवा असलेल्या फॉन्ट मध्ये विद्यार्थी वाचन करू शकतात. तसेच नाईट मोडचा वापर करून रात्री देखील वाचन करू शकता.6.2 दिलेल्या यादीवर लॉंग प्रेस करून आपल्याला हवे असलेले यादीमधील शब्द अथवा वाक्य सिलेक्ट करता येतात व सिलेक्ट करून वाचना मधील जे अडथळे आहेत ते आपण एका अडथळ्यांचे यादीमध्ये टाकू शकतो.
7 सुधारणा यादी यामध्ये यापूर्वी वाचन सराव करताना येणारे अडथळे यादीमध्ये अक्षर, शब्द, वाक्य व उतारा यानुसार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पाहता येतात. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक सुधारणा झाल्यावर सदरच्या यादीमधून वाचता येणारे शब्द सिलेक्ट करून काढून टाकता येतात अथवा कमी करता येतात.
8 वाचन साहित्य वाचनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम पीडीएफ निर्मात्यांकडून निर्मित केलेले वाचनाचे साहित्य ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
9. लेखन - यामध्ये तुम्ही बोटाने अक्षरे लिहू शकता. चित्र काढू शकता अथवा गणिती क्रिया करू शकता. गॅलरी मधून चित्र घेऊन त्यामध्ये रंगभरण करू शकता. अक्षर लेखनासाठी अक्षरे बोटाने गिरवू शकता. हव्या त्या रंगांमध्ये चित्र रंगवीता येते. चित्र रंगवून झाल्यावर ते सेव्ह देखील करता येते.


१.प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती त्याच्या पालकांना पडताळून पाहता येईल त्याच्या सुधारणांची नोंद स्वतः घेता येईल. विद्यार्थी नेमका कोठे चुकतोआहे याचे ज्ञान होईल.
2.वाचन सुधारण्यासाठी व्हिडिओज व वाचन साहित्याचा वापर करता येईल.
3.सदरचे शैक्षणिक साधन हे ॲप स्वरूपात असल्याने ते खराब होण्याची कोणतीही भीती नाही.
४.सदरचे शैक्षणिक साधन हे हे पूर्णपणे मोफत आहे.
5.निर्माते आपल्याला हवे त्या वेळी ऑनलाइन पद्धतीने मध्ये बदल करू शकतात.
6.अमर्याद स्वरुपाचा माहितीचा स्त्रोत अजून निर्माण करता येतो.
7.एकाच व्यक्तीने निर्माण केलेले ऍप हे एकाच वेळी लाखो लोक त्याचा फायदा घेऊ शकतात.
8. इंटरॅक्टिव्ह पद्धतीने विद्यार्थी व साधन यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येते.
9.पालकांना घरबसल्या विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास घेता येतो.

deep dawar diksha mitra 其他应用

下载