Shriram Vidyalaya & Juniour college Android App for parent
(तरूण ऐक्य मंडळ, पंचवटी)
स्थापना - १९२८
पंचवटीतील नागरिकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश डोळया समोर ठेवून शाळेची मुहूर्तमेढ करण्यात आली. कष्टकरी व सामान्य कुटूंबातील मुलांना नाशिकमधील शैक्षणिक सुविधांच्या तोडीचा एकपर्याय उपलब्ध करून देण्यात शाळेचे मोठे योगदान आहे.
आज प्राथमिक विभागात १ ते ४ थी पर्यंत सोळा वर्ग आहेत. बालवाडी विभागात ५ वर्ग असून मोठया गटात २ तर लहान गटात तीन वर्ग आहे.
माध्यमिक विभागात ५ वी १० वी चे एकूण ३२ वर्ग असून ५वी ते ७वी व १०वी चे प्रत्येक पाच वर्ग तर ८वी ९वी चे प्रत्येकी सहा वर्ग आहे.
संस्थेने कनिष्ठ महाविदयालय सुरूकेले असून कला विभागात ११वी व १२वी चे प्रत्येकी एक वर्ग आहेत.
आमची वैशिष्टे–
अद्यावत संगणककक्ष
स्वयंपूर्ण प्रयोगशाळा
सांस्कृतिक वारसा
क्रीडांगण
कलादालन
---------
आमचेउत्सव–
विजयादशमी, गणपतीउत्सव, गुढीपाढवा, रामनवमी, हनुमानजयंती
----------
स्वतःची ओळख - विविध कलागुणदर्शन, वार्षिक स्नेहसंमेलन.
खास ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.